शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

‘शॉक’ लागून ‘जनमित्र’ गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:10 PM

इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी (जनमित्र) शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.देवदत्त सोसायटीच्या परिसरातील वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याची तक्रार महावितरण कार्यालयास प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी समीर ...

इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी (जनमित्र) शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.देवदत्त सोसायटीच्या परिसरातील वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याची तक्रार महावितरण कार्यालयास प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी समीर वाघ (२६), हेमराज कडेकर (३५) हे दोघे सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल झाले. समीर वाघ हे बिघाड दुरुस्तीसाठी खांबावर चढले तेव्हा विजेचा प्रवाह बंद करण्यात आला होता. हेमराज कडेकर हे खांबाजवळ उभे होते. काही मिनिटे झाल्यानंतर अचानकपणे वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावर दुरुस्ती करत असलेले समीर वाघ यांना विजेचा धक्का बसला व ते जिवाच्या आक ांताने ओरडले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर हेमराज कडेकर यांनी तत्काळ भ्रमणध्वनीवरून, ‘वीजप्रवाह का सुरू केला ? तातडीने बंद करा, काम सुरू असून ‘जनमित्र’ला शॉक लागला आहे, असे कळविले’ त्यावेळी तातडीने पुन्हा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि हेमराज यांनी शिडीवरून खांब गाठला. यावेळी त्यांनी खांबावर बसून जिवाची पर्वा न करता समीर वाघ यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला. पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत श्वासोच्छवास देण्यात आला. दरम्यान, सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलीस ठाणे, अग्निशमन मुख्यालयास नागरिकांकडून कळविण्यात आली. क्षणार्धात पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मोठ्या शिडीच्या साहाय्याने हेमराज व जवानांनी अत्यवस्थेत असलेल्या वाघ यांना खाली उरविले. गजानन प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.