विजेच्या झटक्याने वायरमन मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:04 AM2021-02-25T00:04:43+5:302021-02-25T01:39:09+5:30

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.

Wireman dies of electric shock | विजेच्या झटक्याने वायरमन मृत्युमुखी

सोपान चव्हाण

Next
ठळक मुद्देढेकूची घटना : जातेगाव उपकेंद्रावर जमावाचा हल्ला

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.

खांबावर चढलेला सोपान अकस्मात विजेच्या तारेला चिकटला आणि बघता बघता खाली फेकला गेला. उपचारासाठी त्याला नेण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याच्या वृत्ताने ढेकू गावात हलकल्लोळ उडाला. तरुण मयत सोपान चव्हाण (२५, रा. ढेकू) हा ह्यझिरो वायरमनह्ण होता. झिरो वायरमन ही अनधिकृत संकल्पना असून, ग्रामीण भागात विजेच्या खांबावर चढून काम करण्यासाठी अनेक वायरमन, स्थानिक तरुणांकडून अल्प आर्थिक मोबदल्यात काम करून घेत असतात. सध्या वीज वितरण कंपनीची वीजबिल वसुली मोहीम सुरू असून, मुख्य तारांमधील वीजप्रवाह बंद करून, बिलांच्या वसुलीसाठी दबाव आणला जातो असे म्हटले जाते. मयत सोपान हा नेमका दुरुस्तीसाठी चढला होता की कशासाठी याचा खुलासा होऊ शकलेला नाही.
खांबावर चढताना ह्यपरमिटह्ण घेऊन वीज बंद केली जाते. चढलेली व्यक्ती सुरक्षित खाली उतरल्यावरच विजेचा प्रवाह सुरू केला जातो. प्रस्तुत घटनेत लाइनमन हरिश्चंद्र चव्हाण याने वीजप्रवाह बंद केल्याची खात्री करून वायरमन गणेश आहेर यांना कळविले व त्यानंतर सोपान खांबावर चढला होता, अशी माहिती मिळाली. अशावेळी त्याला विजेचा धक्का कसा बसला. यावर तर्कवितर्क सुरू असून, यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी जातेगाव येथे ग्रामस्थांनी तीन तास रस्त्यावर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता वाटपाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अन‌् तणाव निवळला
या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी सुचवलेली मध्यस्थी ग्रामस्थ व मयताचे नातेवाईक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी आमदार सुहास कांदे यांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला व सांयकाळी उशिरा मृतदेह नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोपानची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

Web Title: Wireman dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.