शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

१९ हजार स्थलांतरित पक्ष्यांचे ‘भरतपूर’ला हिवाळी संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:12 IST

गुलाबी थंडीची चाहूल लागताच देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या किलबिलाटाने राज्याचे भरतपूर म्हणून नावलौकिक मिळविणारे नांदूरमधमेश्वर (चापडगाव) पक्षी अभयारण्य गजबजण्यास सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या वन्यजीव विभागाकडून मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. विविध जातींचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरीक्षकांकडून नोंदविण्यात आली.

नाशिक : गुलाबी थंडीची चाहूल लागताच देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या किलबिलाटाने राज्याचे भरतपूर म्हणून नावलौकिक मिळविणारे नांदूरमधमेश्वर (चापडगाव) पक्षी अभयारण्य गजबजण्यास सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या वन्यजीव विभागाकडून मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. विविध जातींचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरीक्षकांकडून नोंदविण्यात आली. एकूणच भरतपूरच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली असून, अभयारण्याच्या परिसरात विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागला आहे.  वनविभागाच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयाच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. राष्टÑीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकांच्या विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन झालेले पहावयास मिळते. हिवाळ्याचा हा हंगाम पक्षीप्रेमींसाठी पर्वणीकाळ ठरतो.थंडीची सुरुवात होताच अभयारण्य पक्ष्यांनी गजबजू लागले आहे. मंगळवारी सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, परिमंडळ अधिकारी पी.के. आगळे, प्रा. आर.बी. पाटील यांच्यासह निफाडचे ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर, वनविभागाने नियुक्त केलेले गाइड अमोल दराडे, गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे आदींनी अभयारण्य परिसरातील विविध निरीक्षण मनोºयांवर दिवसभर ठिय्या देऊन पक्ष्यांचे निरीक्षण करत अधिकृत आकडा नोंदविला. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षीनिरीक्षकांची पावले भरतपूरकडे वळण्यास सुरुवात झाली आहे. वीकेण्डला पर्यटकांसह पक्षीप्रेमींची येथे गर्दी होऊ लागली आहे. या पक्ष्यांचे आगमन कॉमन क्रेन, पेंटेड स्टॉर्क, स्पून बिल, ओपन बिल, व्हाईट आयबिज, ग्लॉसी आयबिज, ब्लॅक आयबिज, पर्र्पल हेरॉन, पॉन्ड हेरॉन यांच्यासह पर्पल मोरहॅन, पिनटेल, तरंग (विजन), सोनूला (गढवाल), शॉवलर (थापट्या), लालसरी, भुवयी बदक (गार्गनी), जकाना, मार्श हॅरियर, स्पॉट बिल डक आदी प्रकारचे पक्षी येथील पाणथळ जागेवर भूक भागविताना दिसून येत आहेत.  यामध्ये कादंब, पट्ट कादंब, फ्लेमिंगो या पक्ष्यांची प्रतीक्षा कायम आहे. याबरोबरच शिकारी पक्ष्यांचेही आगमन झाले आहे. एकूण १९ हजार ५२६ पक्ष्यांनी अभयारण्य सध्या गजबजल्याचे वन्यजीव विभागाकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.