नि-हाळेच्या नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 18:02 IST2019-12-09T18:02:13+5:302019-12-09T18:02:51+5:30

नि-हाळे : सिन्नर तालुक्यातील नि-हाळे -फत्तेपूर येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला .

 Winter Competitions Started at Non-Recent Nike Schools | नि-हाळेच्या नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना प्रारंभ

नि-हाळेच्या नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना प्रारंभ

१४ डिसेंबर या क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच अण्णा काकड यांच्या हस्ते करण्यात आले. क्र ांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात दरवर्षी हिवाळी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने कबड्डी, खो-खो, भाला फेक, लंगडी, चमचा लिंबू, संगीत खुर्ची, क्रिकेट, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विजेत्या होणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. दत्तात्रय बारकू दराडे यांच्या स्मरणार्थ बी. डी. दराडे यांच्याकडून बक्षीसे देण्यात येणार आहेत. यावेळी मुख्याध्यापक साहेबराव कुटे, शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, गोटीराम सांगळे आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Winter Competitions Started at Non-Recent Nike Schools

टॅग्स :Schoolशाळा