शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागाईतदारांना वाइनरींचा हात

By admin | Updated: March 10, 2015 22:41 IST

पिकाचे नुकसान : व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

वरखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातक्षम व स्थानिक बाजारपेठेतील द्राक्ष उत्पादक पुरता खचून गेला असताना, व्यापारीवर्गाने नाकारलेल्या द्राक्ष बागाईतदारांना सुला वाइन्सने मदतीचा हात दिला असून, मोठ्या प्रमाणात द्राक्ष खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. द्राक्ष बागाईतदारदेखील वाइनरीसाठी द्राक्षे देण्यास तयार झाले आहेत.दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी) येथील सुला वाइन्स येथे आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार मंदार कुलकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील, पंचायत समिती उपसभापती भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे व सुला वाइन्सचे अ‍ॅग्रीकल्चर जनरल मॅनेजर नानासाहेब शेळके यांच्या समवेत द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये द्राक्ष उत्पादकांनी बेमोसमी पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने निर्यातक्षम द्राक्ष व त्याचप्रमाणे देशांतर्गत द्राक्षांना व्यापारीवर्गाने नाकारल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. व्यापारीवर्गाने बाजारभावापेक्षा कमी दराने द्राक्षे खरेदी केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेदाणे निर्मितीसाठीदेखील खरेदी होत नसताना अखेर वाइनरीसाठी द्राक्षांची खरेदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रमाणे सुला वाइन्सच्या वतीने तडे गेलेले द्राक्ष खरेदी करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी सुला वाइन्सचे प्रशांत क्षत्रिय, महेश भाईबंद, पोलीसपाटील राजेंद्र पाटील, बापू पाटील, परिसरातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागाईतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.