विल्होळीत पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:56 IST2018-11-25T00:56:35+5:302018-11-25T00:56:57+5:30

विल्होळी येथे जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे जय बाबाजी भक्त परिवार व विल्होळी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 WILLIATI PALAKHI SOCIAL | विल्होळीत पालखी सोहळा

विल्होळीत पालखी सोहळा

विल्होळी : विल्होळी येथे जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे जय बाबाजी भक्त परिवार व विल्होळी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.  पुढच्या महिन्यात १३ ते २३ डिसेंबर दरम्यान, श्री क्षेत्र वेरुळ येथे अनुष्ठान सोहळा, होम-हवन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, असून त्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराला आवाहन करण्यासाठी शांतीगिरी महाराज यांचे आगमन झाले. यावेळी पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी जनार्दन स्वामी यांच्या पादुका व पालखीचे दर्शन घेतले. याप्रसंगी सरपंच बाजीराव गायकवाड, तानाजी मते, निवृत्ती डांगे, सावळीराम डांगे, कारभारी भावनाथ, प्रशांत देशमुख, निवृत्ती देशमुख, मोतीराम भावनाथ, भाऊसाहेब भावनाथ आदी उपस्थित होते.

Web Title:  WILLIATI PALAKHI SOCIAL