शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांच्या नोकरीचा प्रश्न चिघळणार

By admin | Updated: October 23, 2016 23:00 IST

घोटी : स्थानिकांना प्राधान्य न दिल्याने नाराजी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल फोटो फिल्म लिमिटेड कंपनीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी संपादन केलेल्या असताना, तालुक्यातील मुकणे धरणातून पाणी दिले असताना या कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्या यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने आता या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून कंपनीचा रस्ता बंद करण्याचा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेण्यात येत आहेत. याबाबत मनसेचे सरचिटणीस रतनकुमार इचम, उपजिल्हाप्रमुख संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूलचंद भगत यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, औद्योगिक महामंडळाचे आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र, निमा, तहसीलदार, पोलीस प्रशासन आदिंकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे महाराष्ट्र नवीनर्माण सेनेने आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.  दरम्यान, या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी तालुक्यातील मुंढेगाव, सोमज, मोगरे, मालुजे, समनेरे, वाघेरे, नांदगाव सदो, माणिकखांब आदि गावांत बैठका घेण्यात आल्या.  या बैठकीस जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम, तालुकाध्यक्ष संदीप किर्वे, मूलचंद भगत यांच्यासह गणेश उगले, प्रताप जाखेरे, सुशील गायकर, भगीरथ मराडे, एकनाथ गायकर, विजय भोर, नंदू पांडेकर, सोमनाथ कडू, जनार्दन गतिर, अंकुश गतिर, मनोज भगत, मच्छिंद्र भटाटे, बाळू चव्हाण, बलायदुरी, नीलेश जोशी, अनिल भटाटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)