कांदा उत्पादकांना रडवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST2019-12-22T23:11:03+5:302019-12-23T00:24:21+5:30
गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.

कांदा उत्पादकांना रडवणार?
गोरख घुसळे।
पाटोदा : गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.
चांगला दर हाती लागावा म्हणून शेतकरी अपरिपक्व कांदा विक्रीसाठी आणत आहेत. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होत असून, औषधे फवारणीचा खर्च डोईजड होताना दिसत आहे. बाजारभावातील चढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी शेतात उपलब्ध असलेला कांदा
विक्र ीवर भर दिला आहे.
खरीप कांद्यापाठोपाठ रब्बी रांगडा कांदा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपेही ढगाळ हवामान, धुके व दवामुळे खराब झाली आहेत. त्यांच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. रब्बीच्या गहू, हरभराप्रमाणेच कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पोळ कांदा शेतातच सडून गेल्याने कांदा दरात अचानक वाढ झाली. रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी आवश्यक कांदा रोपेही या पावसाने सडून गेल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.
कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येवला तालुक्यासह निफाड, चांदवड, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव या भागातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा रोपांना सोन्याचा भाव आला आहे. मिळेल त्या दराने शेतकºयांनी रोपे खरेदी केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कांदा पिवळा पडत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा निम्मे उत्पादनदेखील हाती लागले नाही.
कांदा विक्रीवर शेतकºयांचा भर
कांदा लागवड, मजुरी व कीटकनाशक फवारणीचा खर्च लाखात गेला आहे. आज मिळणारा बाजारभाव पाहता शेतकºयांना जास्तीचा दर मिळत आहे असे दिसत असले तरी ते खर्चाच्या हिशेबाने कमी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कांद्याच्या दरात चार हजारांनी घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. बाजारभावातील
चढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकºयांनी शेतात उपलब्ध असलेला कांदा विक्र ीवर भर दिला आहे.
सुमारे साठ हजार रुपयांची कांदा रोपे विकत आणून एक एकर कांदा लागवड केली. मजुरी, लागवड खर्च, मशागत असा सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. त्यात बाजारभावात चढ-उतार सुरू असल्याने कांदा उत्पादनासाठी केलेला लाखाचा खर्च वसूल होईल का? याची चिंता आहे.
- सुरेश शेलकी,
कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगाव
कांदा लागवडीसाठी सुमारे चारवेळा बियाणे टाकली. अवकाळी पावसाने लागवड
केलेला पोळ कांदा व दुसºयांदा टाकलेले कांदा रोप खराब झाले. तिसºयांदा टाकलेले उळे दाट धुके व दवामुळे खराब झाले. आता
पुन्हा बियाणे टाकली असून, बदलत्या वातावरणामुळे त्याचीही शाश्वती राहिलेली नाही. बियाणांसाठी मोठा खर्च झाला आहे.
- प्रभाकर बोरणारे,
शेतकरी पाटोदा