ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे स्थलांतर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:18 AM2019-07-25T01:18:07+5:302019-07-25T01:18:31+5:30

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात प्रस्तावित करण्यात आलेला हरित विकास म्हणजेच ग्रीन फिल्ड प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

 Will Green Field Project Transfer? | ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे स्थलांतर होणार?

ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे स्थलांतर होणार?

Next

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात प्रस्तावित करण्यात आलेला हरित विकास म्हणजेच ग्रीन फिल्ड प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांची बागायती शेती जाण्यापेक्षा अन्यत्र जागा असेल तर सुचवा असे खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सूचित केले असून, त्यांनी काही जागाही सूचवल्या आहेत. तसेच मुंबईत यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या अधिका-यांसमवेत बैठक बोलाविण्याचे आश्वासनदेखील महाजन यांनी बुधवारी (दि.२४) दिले.
मुंबई येथे यासंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी हे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून मौजे नाशिक व मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट अर्थात हरित क्षेत्र विकास योजना राबविण्यात येणार आहे. याठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा असतील आणि भूखंड विक्रीला उपलब्ध असतील. त्यासाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊन नगरविकास योजना राबविण्यात येणार आहे. सर्व शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पन्नास टक्के जागा असलेले फायनल प्लॉट देण्यात येणार आहेत. वाढीव एफएसआय आणि अन्य पायाभूत सुविधादेखील जागा मालकांना देण्यात येणार आहे. सुरुवातीला सर्वच शेतकºयांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे कंपनीला
बागायती जमिनीचा व्हिडीओ दाखवला
मखमलाबाद शिवारात बागायती जमिनी मोठ्या प्रमाणात असून, नागरी वसाहती आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण करून तेच बुधवारी (दि.२४) पालकमंत्री गिरीश महाजन यांना दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांनीदेखील सबुरीचे धोरण घेतल्याचे वृत्त आहे. विशेषत: विधानसभा निवडणुका तोंडावर असून त्यामुळेच त्याबाबत आता सबुरीचे धोरण घेतले गेल्याचे सांगितले जात आहे.
शेतकºयांत यासंदर्भात दोन गट असून प्रबळ विरोध करणाºया गटाने बुधवारी (दि.२४) मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि सदरचा भाग हा शेतीसाठी उपयुक्त असून त्यात अनेकांनी ऊस लावला आहे. बागायती क्षेत्र उद्ध्वस्त करून त्यावर इमले कसे काय बांधता येतील याबाबत शेतकºयांनी कैफियत मांडली. स्मार्ट सिटीअंतर्गत योजना राबविण्यास विरोध नाही, मात्र जागा चुकल्याचे म्हणणे शेतकºयांनी मांडले.
..या पर्यायी जागांची झाली सूचना
म्हसरूळ-आडगाव रोडवरील जागा
आरोग्य विद्यापीठाच्या समोर डोेंगर परिसरात असलेली
मोकळी जागा
अंबड जवळील पांझरापोळच्या ताब्यात असलेले क्षेत्र

Web Title:  Will Green Field Project Transfer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.