पतीपाठोपाठ पत्नीचेही निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:42 IST2018-09-02T00:40:42+5:302018-09-02T00:42:29+5:30

सटाणा : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या पतीच्या मृतदेहाला मुलाने अग्निडाग देताच पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दु:खदायक घटना सटाणा शहरात घडली.

Wife's wife dies after husband | पतीपाठोपाठ पत्नीचेही निधन

पतीपाठोपाठ पत्नीचेही निधन

ठळक मुद्देअंजनाबाई यांची स्थिती पाहून महिलांनी भीतीने आरडाओरड

सटाणा : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या पतीच्या मृतदेहाला मुलाने अग्निडाग देताच पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दु:खदायक घटना सटाणा शहरात घडली.
सटाणा नगरपालिकेचे कर्मचारी अजय धर्मराज पवार यांचे वडील धर्मराज रामचंद्र पवार (७५) यांचे शनिवारी दुपारी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या पतीचे निधन झाल्याने अंजनाबाई पवार ११ वाजेपासून धाय मोकलून रडत होत्या. पती धर्मराज पवार यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नातलगांनी वाहनात ठेवला असता पत्नी अंजनाबाई जिवाचा आकांत करून एकटे जाऊ नका, मलाही सोबत न्या.. तुमच्याशिवाय मी कशी जगू असे म्हणत रडत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
सर्व कुटुंबीयांनी त्यांना धीर देत आता रडू नका असे सांगत मृतदेह येथील नवे अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी आणला. मयत धर्मराज यांच्या मृतदेहाला त्यांची मुले अजय व प्रशांत यांनी सायंकाळी ६ वाजता अग्निडाग देताच धर्मराज यांच्यासोबत कधीकाळी सात जन्माच्या फेºय घेतलेल्या त्यांच्या पत्नी अंजनाबाई धर्मराज पवार (६८) यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सर्व पुरु ष मंडळी अंत्यविधीसाठी गेलेले असतांना अंजनाबाई यांची स्थिती पाहून महिलांनी भीतीने आरडाओरड केली. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका कारला थांबवून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.पतीच्या मृतदेहाला अग्निडाग दिल्यानंतर पत्नीला आलेला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर झालेले त्यांचे निधन शहरवासीयांना चटका लावून गेले. पती-पत्नीची एकाच दिवशी झालेली एक्झीट आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची मुलांवर आलेल्या दुर्दैवी वेळ यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


 

Web Title: Wife's wife dies after husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक