पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:58 IST2018-07-25T23:58:17+5:302018-07-25T23:58:36+5:30

पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप
नाशिक : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिचा गळा दाबून खून करणाºया पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ रोहित सुरेश मकवान (रा़ संसरी गाव, देवळाली कॅम्प,) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव असून, १३ एप्रिल २०१५ रोजी ही घटना घडली होती़
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता़ सहायक पोलीस निरीक्षक एस़ एच़ सरडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील विद्या जाधव यांनी साक्षीदार तपासले़