आधी पत्नीने केली आत्महत्या; पाठोपाठ पतीची विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 01:48 IST2022-04-18T01:47:33+5:302022-04-18T01:48:24+5:30

चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विष पिल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती-पत्नी आत्महत्येप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

Wife commits suicide; Husband jumps into the well next | आधी पत्नीने केली आत्महत्या; पाठोपाठ पतीची विहिरीत उडी

आधी पत्नीने केली आत्महत्या; पाठोपाठ पतीची विहिरीत उडी

नाशिक : चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विष पिल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती-पत्नी आत्महत्येप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

खेलदरी येथील रेखा किरण दौंड (३०) या महिलेने शनिवारी (दि.१६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केल्याने तिचा भाया बाळासाहेब दौंड यांनी औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केल्याची खबर मुजफ्फर रहेमान पटेल यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली. ही घटना घडत नाही तोच मृत रेखा दौंड हिचे पती किरण चिंधू दौंड (३५), रा. खेलदरी याने रविवारी (दि.१७) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत पाण्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. याची खबर पुरीचे पोलीस पाटील चिंधू भावराव आव्हाड यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली. याबाबत दोघांच्या मृत्यूबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Wife commits suicide; Husband jumps into the well next