शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

नाशिक कोरोनाचा हॉट स्पॉट झाल्यास जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 23:03 IST

नाशिक मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत या बाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहरात होणारी घुसखोरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे अशा घुसखोरांमुळे नाशिक कोरोना बाधीतांचे हॉट स्पॉट ठरले तर जबाबदारी कोणाची अस प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवाढती घुसखोरी चिंता वाढविणारीयंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा 

संजय पाठक, नाशिक : कोरोनाचा भयंकर संसर्ग टाळण्यासाठी महिनाभर देशभर लॉक डाऊन होता.  आता कुठे नाशिक शहरात सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असताना नाशिक शहरातही कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत याबाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहरात होणारी घुसखोरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे अशा घुसखोरांमुळे नाशिक कोरोना बाधीतांचे हॉट स्पॉट ठरले तर जबाबदारी कोणाची अस प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक स्फोटक परिस्थती मालेगावात आज निर्माणझाली. मात्र तत्पूर्वी पहिलाच रूग्ण निफाड मध्ये आढळला आणि त्यानंतर नाशिक शहरातील गोविंद नगर येथे पहिला रूग्ण आढळला होता. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोविंद नगर मधील त्या बाधीताच्या घरापासून तीन चौरस किलो मीटरचे क्षेत्र सील केले आणि ज्यया पध्दतीने तपासणी मोहिम राबविली. त्यातून शहरातील त्या भागात अधिक संसर्ग वाढला नाही. मात्र, त्यानंतर देखील दोन नाशिककरांना बाहेर प्रवास  केल्याने संसर्ग झाल्याचे आढळल्याने तेथे देखील पाचशे मीटर क्षेत्र सील करण्यातआले.परंतु त्यानंतर शहरात सिडकोतील अंबड लिंकरोडसह सर्वच ठिकाणी बाहेरून आलेल्यांनी आणि महापालिकेकडे वेळेत खबर न देणाऱ्यांनाच संसर्ग असल्याचे आढळले. दरम्यान, लॉक डाऊनचा पहिला टप्पा पार पडला. तस तसे शहरात बाहेरून चोरी छुपे नागरीक येऊ लागले. त्याची जाणिव झाल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी थेट सीआरपीएफ बोलविण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली. तीसाधार होती आणि महापौरांनी तसे पत्रात सोदाहरण नमूद केले होते. मात्र, ती किती योग्य आहे, ते शनिवारी (दि.२) एकाच दिवसात सहा रूग्ण आढळल्याने जाणवते. कोरोनाशी खऱ्या अर्थाने दोन हात करणारे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या टीमसह काम करण्यात कोणतीही कसर सोडली नाहीच. परंतु त्यांनीही हा धोकाओळखून पोलिसांना पत्र दिले आणि सर्वच मनपा हद्दीवर गस्त वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर देखील प्रश्न सुटला नाही हे स्पष्ट होत आहे. या आधी मानखुर्द येथून पायी चालत १२ सुरक्षा कामगार मनपा हद्दीत पोहोचले त्यातील एकाल कोरोना झाल्याचे आढळले. त्यावेळी देखील पोलीसांनी शहर जिल्हयाच्या सीमा सील केल्या असतानाही ते शहरात कसे काय घुसले हा प्रश्न होताच परंतु आजही हजारोे मजुर टप्प्याटप्पाने जात असताना त्यांनामहामार्गावर आणि अन्यत्रही कोठेही अटकाव होताना दिसत नाही. आता तर भडगाव येथुन दुधाच्य टॅँकरमध्ये बसून लपून आलेल्या एका रूग्णामुळे निर्बंध कोठे आहेत, असा प्रश्न पडतो.  मुळात जिल्हा शहरच्या सीमाच काय परंतु शहरात कुठेही फिरल्यानंतर मुख्यमार्ग आणि मुख्य भागातील बाजारपेठा वगळता सर्वच गर्दी जाणवत आहे. त्यामुळे काही  दिवसांपूर्वी बाहेर पडताना पोलिसांची वाटणारी भीतीही नष्ट झाली आहेत. अत्यावश्यक सेवा आणि मदतीच्या नावाखाली एनजीओंना दिलेल्या सवलतींचा खरोखरीच त्याच कामासाठी वापर होतोय का, मालवाहतूकीत माल कमी आणि नागरीकांची वाहतूक जास्त होतेय का, अशा सर्वच बाबतीत फेर आढाव्याची गरज आहे. शहर केवळ स्वच्छ आणि सुरक्षीत नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील उत्तम राहीले पाहिजे, परंतु रूग्ण संख्या वाढत गेली आणि त्यातून नाशिककरांच्या जीवावर बेतले तर जबाबदारी कोण पत्कारणार? की टोलवा टोलवीच चालणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस