शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

‘यांच्या’ व्यथा जाणिल्या कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:55 AM

नाशिक : घंटागाडी थोडी उशिरा आली की, कामगारांच्या नावाने बोटे मोडायला आपण मोकळे होतो. परंतु, आयुष्यभर घाण-कचºयातच काम करणाºया या कामगारांच्या व्यथा-वेदना जाणल्या आहेत कुणी?

ठळक मुद्देकर्करोगासारख्या दुर्धर आजारानेही पछाडलेकेवळ कागदावरच पुरविल्या जाणाºया या सोयी-सुविधा

नाशिक : घंटागाडी थोडी उशिरा आली की, कामगारांच्या नावाने बोटे मोडायला आपण मोकळे होतो. परंतु, आयुष्यभर घाण-कचºयातच काम करणाºया या कामगारांच्या व्यथा-वेदना जाणल्या आहेत कुणी? महापालिकेकडून ठेकेदारांमार्फत शहरात चालविल्या जाणाºया घंटागाड्यांमध्ये जवळपास आठशेच्या आसपास कामगार काम करतात. मात्र, या कामगारांना कोणतीही संरक्षक साधने पुरविली जात नसल्याचे भीषण वास्तव आहे. त्यातूनच अनेक कामगारांच्या आरोग्य समस्या वाढीस लागून त्यांना श्वसनाचे, पोटाचे तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजारानेही पछाडले आहे. महापालिकेने ठेकेदारांशी केलेल्या करारनाम्यात अटी-शर्तींनुसार, कामगारांना गणवेश, गमबूट, हॅण्डग्लोज, मास्क पुरविणे बंधनकारक आहे. परंतु, केवळ कागदावरच पुरविल्या जाणाºया या सोयी-सुविधा कामगारांना प्रत्यक्ष मिळतात की नाही, याबाबत महापालिकेचे मुखंड उदासीन आहेत. शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, पूर्व आणि पश्चिम या सहा विभागांमध्ये महापालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये ठेकेदारांना घंटागाडीचा ठेका दिलेला आहे. पाच वर्षांसाठी हा ठेका देताना त्याचा करारनामा करण्यात आलेला आहे. या करारनाम्यात कामगारांना आवश्यक ती संरक्षक साधने पुरविणे हे बंधनकारक आहे. परंतु, ‘लोकमत’ने वस्तुस्थिती जाणून घेतली असता, कामगारांच्या हातात ना ग्लोज आढळले, ना त्यांच्या पायात गमबूट. चेहºयाच्या मास्कची तर बाबच दूर. हाताने घाण-कचरा स्वीकारत, गाडीतच ओला-सुका कचºयाचे विलगीकरण करत शहरातून जमा झालेला कचरा खतप्रकल्पावर नेऊन टाकण्याचे काम सुरू आहे. वास्तविक घंटागाडीवर काम करणाºया कामगारांची दर सहा महिन्यांनी एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु, आरोग्य तपासणीबाबत महापालिका उदासीन आहे. त्याचे ठेकेदारांनाही सोयरसुतक नाही. दैनंदिन कामात तर कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांतील अनेक जण कुटुंबप्रमुख आहेत. परंतु, त्यांना कामाच्या मोबदल्यासाठीही झगडावे लागते. कामगार संघटनांमार्फत त्यांच्या समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली जातात. परंतु, उपेक्षित असलेल्या या घटकाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. जो शहराचा कचरा नित्यनेमाने उचलतो त्याच कामगाराची कचºयासारखी स्थिती बनलेली आहे. त्याच्या मागे समर्थ, ताकदवार असा ‘आवाज’ नाही, हे त्याचे मोठे दुर्दैव आहे. महापालिकेशी झालेल्या करारनाम्यानुसार, घंटागाडीवर तीन कामगार, त्यात एक बदली कामगार आणि सुटीच्या दिवसाचा कामगार पुरविणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. परंतु, या अटी-शर्तीचे पालन होताना दिसून येत नाही. बºयाच घंटागाड्यांवर दोनच कर्मचारी कामकरताना दिसून येतात. एक वाहनचालक आणि दुसरा कचरा संकलक. बºयाचदा वाहनचालकालाही कचरा संकलकाची भूमिका निभवावी लागते. घंटागाडीवर सध्या सेवाज्येष्ठतेनुसार ४५० कामगार कार्यरत आहेत. महापालिकेने नवीन घंटागाड्या वाढविल्याने सुमारे ३५० ते ४०० कामगार नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे, सुमारे ८००च्या आसपास कामगार काम करत असल्याचे दाखविले जात असले तरी, सुमारे २०० घंटागाड्यांचा विचार करता प्रत्यक्षात दोन किंवा तीनच कामगार एका घंटागाडीवर दिसून येतात. घंटागाडी कामगारांची संख्या पुरेशी नसल्याने बºयाचदा अनेक कामगारांना दोन-तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागत असल्याची संघटनेची तक्रार आहे. घंटागाडी कामगार हे सतत घाण-कचºयात काम करत असतात. कचºयाच्या दुर्गंधीतही त्यांना त्यांच्या कामाची क्षमता टिकवून ठेवावी लागत असते. कामगारांना तोंडाला लावण्यासाठी मास्क देणे बंधनकारक आहे. त्याचा पुरवठा ठेकेदाराने करणे अनिवार्य आहे. परंतु, आजमितीला एकही घंटागाडी कामगार मास्क घालून काम करताना दिसून येत नाही. त्याऐवजी, अनेक कामगार तोंडाला हातरुमाल बांधून त्याचाच मास्क म्हणून उपयोग करतात. वास्तविक दर आठवड्याला घंटागाडी कामगारांना दर्जेदार मास्क पुरविणे गरजेचे आहे. त्याचे रेकॉर्डही ठेकेदाराने ठेवले पाहिजे आणि ते महापालिकेला सादर केले पाहिजे. परंतु, ठेकेदाराकडून असे रेकॉर्ड ठेवले जात असले तरी त्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह आहे आणि महापालिकेच्या आरोग्य विभागालाही त्याबाबत वास्तव जाणून घेणे गरजेचे वाटत नाही. मास्कचा पुरवठा होत नाही तसेच गमबूटही दिले जात नाहीत. घाण-कचºयात पाय रोवून काम करणाºया कामगारांना त्यामुळे पायांना अनेक जखमा झाल्याचे दिसून येते. बºयाचदा कचºयात काचा, जैविक कचºयातील इंजेक्शने यांसारखे प्रकार टाकून दिलेले असतात. ते संरक्षक साधने नसलेल्या कामगारांच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे. याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे उदासीन आहे.करारनाम्यानुसार, प्रत्येक घंटागाडी कामगाराला हॅण्डग्लोज पुरविणे बंधनकारक आहे. परंतु, प्रत्यक्षात कामगारांच्या हातात कुठेही ग्लोज दिसून आले नाही. कामगारांकडून ग्लोजविनाच कचºयाचे संकलन केले जात आहे. त्यातून नखांमध्ये जीवजंतू जाऊन कामगारांना रोगाला निमंत्रण मिळते आहे. काही नागरिक हे घातक कचराही घंटागाडीत टाकून देतात. त्याचे विलगीकरण करतानाही कामगारांना जखमा होतात. कामगारांना हात धुण्यासाठी तसेच पिण्यासाठी वाहनाच्या पार्किंगच्या ठिकाणी तसेच खतप्रकल्पावर पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, तशी सुविधाही उपलब्ध करून देण्यास महापालिका असमर्थ ठरलेली आहे. वास्तविक हात धुण्यासाठी कामगारांना साबणही उपलब्ध करून द्यायला हवा. परंतु, पाणीच मिळत नसेल तर साबणाची सुविधा दूरच आहे.