पांढुर्लीत कांदा लिलावास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:45 IST2020-05-13T21:17:39+5:302020-05-14T00:45:14+5:30
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा शेतमाल लिलावास शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी ४७५ गोण्यांतून अंदाजे २६१ क्विंटल आवक झाली. सर्वात जास्त बाजारभाव ११११ रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी बाजारभाव ८०० रुपये राहिला.

पांढुर्लीत कांदा लिलावास सुरुवात
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा शेतमाल लिलावास शुभारंभ करण्यात आला.
लिलावाच्या पहिल्याच दिवशी ४७५ गोण्यांतून अंदाजे २६१ क्विंटल आवक झाली. सर्वात जास्त बाजारभाव ११११ रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी बाजारभाव ८०० रुपये राहिला. लिलावाच्या उद्घाटनप्रसंगी शेतकरी ट्रेडर्स नाशिकचे नंदकुमार जाधव, दिलीप सोनवणे, अभिजित सोनवणे त्याचप्रमाणे परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी, समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. पांढुर्ली उपबाजारात कांदा शेतमाल लिलाव दर सोमवार, शुक्रवार या दोन दिवशीच सुरू राहणार असून, परिसरातील शेतरकऱ्यांनी या दिवशी कांदा शेतमाल गोणीबंद पद्धतीने उपबाजारात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी केले आहे.