प्रवास करताना महिलेचे ९० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:51 IST2019-05-04T00:50:37+5:302019-05-04T00:51:40+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील सलमा ललिता पठाण (२९) अहमदनगर ते कळवण बसमधून प्रवास करून नाशिक येथे उतरल्यानंतर सिडकोच्या दिशेने जात असताना त्यांचे ९० हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली आहे.

प्रवास करताना महिलेचे ९० हजार लंपास
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील सलमा ललिता पठाण (२९) अहमदनगर ते कळवण बसमधून प्रवास करून नाशिक येथे उतरल्यानंतर सिडकोच्या दिशेने जात असताना त्यांचे ९० हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर ते कळवण बसने सलमा पठाण नाशिकला आल्या होत्या. येथे उतरून त्या सिडकोत राहणाऱ्या आई-वडिलांक डे सिडको येथे जाण्यासाठी रिक्षातून इंदिरानगर बोगदा असा प्रवास करीत असताना त्यांच्या बॅगेतील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दहा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. त्यांनी या घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.