मुंबईकडून नाशिकच्या दिशेने चौघे मित्र समृद्धी महामार्गावरून बुधवारी मध्यरात्री परतीचा प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या कारचे (एम.एच१५ ईएक्स६६८८) अचानकपणे भीवंडीच्या पुढे टोलनाक्याजवळ टायर फुटले. यामुळे कार कोलांटउड्या घेत डंपरवर जाऊन धडकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या भीषण अपघातात सिडकोमधील उत्तमनगर येथील युवक दुर्गेश गोविंद इंगळे (२५) हा युवक गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला. त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
सिडको परिसरातील उत्तमनगर येथील रहिवासी असलेल्या दुर्गेश व त्याचे तीन मित्र हे कारमधून समृद्धी महामार्गाने भिवंडीकडून नाशिकला येत होते. ओलांडल्यानंतर टोलनाक्याजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचे टायर फुटले.
टायर फुटल्यामुळे कार उलटली अन् डंपरवर जाऊन भिवंडी आदळली. यामध्ये कारचालक दुर्गेशचा मृत्यू झाला. त्याचे तीन मित्र या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंगळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. उत्तमनगर परिसरात त्याच्या मृत्यूने शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.