शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या योग विद्यापीठाचा ‘योग’ कधी येणार? दहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्णयाची अद्याप प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:22 IST

१० वर्षं उलटून गेल्यावरही नाशिकमध्ये योग विद्यापीठ उभारणीची अद्याप प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक: योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे २०१५ मध्ये देशात योग विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी केंद्रासह राज्यातही भाजप युतीचे सरकार होते. १० वर्षं उलटून गेल्यावरही नाशिकमध्ये योग विद्यापीठ उभारणीची अद्याप प्रतीक्षा आहे.

धार्मिक, नैसर्गिक, भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर किंवा इगतपुरी तालुक्यात योग विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी नाशिककरांतर्फे तत्कालीन केंद्रीय आयुष राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. मुंबईत त्यासंदर्भात ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केवळ आश्वासने मिळाली. प्रस्तावानंतर तब्बल १० वर्षांचा कालावधी उलटूनही योग विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण होण्याची अद्यापही प्रतीक्षा आहे. 

राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची आरोग्यदायी हवा, मुबलक पाणी अन्य शहरांच्या तुलनेत कमी प्रदूषण असल्याने योग विद्यापीठासह वेलनेस सेंटर उभारणे शक्य असल्याचा प्रस्तावही देण्यात आला होता.  त्यानंतर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात वेलनेस सेंटर उभारण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून घोषणा झाली. गत पंचवार्षिकमध्येही वेलनेस सेंटरचा प्रस्ताव देण्यात येऊन तो रेंगाळलेला आहे.

का होतोय विलंब?पर्यटन विभागाला जागा मिळत नसल्याने विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे. राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही गाडी पुढे सरकली नाही. नाशिकमध्ये सर्वसमावेशक असे आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ, वेलनेस सेंटर निर्माण झाल्यास नाशिक आणि महाराष्ट्राच्या लौकिकात निश्चितच भर पडेल. आंतरराष्ट्रीयदृष्ट्यादेखील तो देशाच्या अभिमानाचा मानबिंदू ठरू शकेल.  

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक