मुख्यमंत्र्यांचा ताफा पोलिसांच्या दोराला अडकतो तेव्हा़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:21 IST2017-12-26T23:11:59+5:302017-12-27T00:21:18+5:30
शेल्टर प्रदर्शनासाठी शहरात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा शरणपूररोड सिग्नलवर अपघात होता होता वाचला़ शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शरणपूर सिग्नलवर लावलेल्या दोरास दोन वाहने अडकताना वाचली, तर एक शासकीय वाहन सरळ दक्षिणमुखी मारुती मंदिराकडे निघाले़ एरवी दंडवसुलीत मग्न असलेल्या शहर वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय यानिमित्ताने आला़

मुख्यमंत्र्यांचा ताफा पोलिसांच्या दोराला अडकतो तेव्हा़
नाशिक : शेल्टर प्रदर्शनासाठी शहरात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा शरणपूररोड सिग्नलवर अपघात होता होता वाचला़ शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शरणपूर सिग्नलवर लावलेल्या दोरास दोन वाहने अडकताना वाचली, तर एक शासकीय वाहन सरळ दक्षिणमुखी मारुती मंदिराकडे निघाले़ एरवी दंडवसुलीत मग्न असलेल्या शहर वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय यानिमित्ताने आला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेल्टर प्रदर्शनातील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा व पोलिसांचा ताफा हा कॅनडा कॉर्नरमार्गे शरणपूररोड सिग्नलकडे येत होता़ याठिकाणी वाहतूक पोलिसांनी मायको सर्कलकडे जाणाºया रस्त्यावर दोर बांधून ठेवलेला होता़ पोलिसांना हा दोर काढण्याचा विसर पडला की काय, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापैकी एक पांढºया रंगाचे वाहन सिग्नलवरून सरळ दक्षिणमुखी मारुती मंदिराकडे जाऊ लागले, तर उर्वरित दोन वाहने या बांधलेल्या दोराच्या अगदी समीप जाऊन थांबले आणि एकमेकांवर आदळून होणारा अपघात होता होता वाचला़ वाहतूक पोलीस कर्मचाºयाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने धावत येऊन तत्काळ दोर सोडला व तिन्ही वाहने मायको सर्कलकडे रवाना झाली़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्गबाधित शेतकरी काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यामुळे पोलिसांनी मुख्यमंत्री जाणार असलेल्या रस्त्यावर जागोजागी वाहतूक पोलीस तैनात करण्याबरोबरच बॅरिकेडिंग केले होते़
बंदोबस्ताचा नागरिकांना फटका
वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह राज्य राखीव पोलीस बल, राखीव पोलीस दल यांच्या तुकड्या व त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवण्यात आली होती़ तसेच या कालावधीत रस्त्याने पायी तसेच वाहनाने जाणाºयांना पोलिसांकडून हाकलले जात होते़ यामुळे शेल्टर प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही काही काळ ताटकळत बसावे लागले़ विशेष म्हणजे, एका निमंत्रितालाच पोलिसांनी प्रवेश नाकारण्याची घटना घडली़ चोख पोलीस बंदोबस्ताचा फटका अनेकांना बसला. वाहने थांबवून धरण्यात आल्याने अनेकांची गैरसोय झाली.