Wheat, gram flour in the tide | ज्वारीच्या आगारात बहरला गहू, हरभरा

ज्वारीच्या आगारात बहरला गहू, हरभरा

ठळक मुद्देज्वारीच्या पिकातून पाहिजे तसे उत्पादन निघत नसल्याने शेतकरी मका, सोयाबीन, कपाशी, कांदा या पिकांकडे वळाले आहे

जळगाव नेऊर : जिल्ह्यातील मोठे महुसली क्षेत्र असलेल्या जळगाव नेऊर, नेऊरगाव, मानोरी व मुखेड परिसरात एकेकाळी ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जायचे. शेतशिवारात फुललेल्या पिकावर ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांचे थवेच्या थवे बघायला मिळायचे. मात्र, आता चित्र पालटले असून ज्वारीच्या पिकाची जागा गहू, हरभरा या पिकांनी घेतली आहे. त्यामुळे एकेकाळी ज्वारीचे आगार असलेल्या या परिसरात ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.
गेल्या वर्षी पाऊस वेळेवर व भरपूर झाला. त्यामुळे मका, सोयाबीनची लागवड झाली. मात्र, मका पिकाला लष्करी अळी ने ग्रासले तर सोयाबीनचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाची पेरणी केली तर असंख्य शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी कांदा, गहु, हरभरा पिकाची पेरणी केली. या परिसरातून कडबा या पशुधनाच्या चा-याची लाखोंची उलाढाल होत असते. चारा खरेदीसाठी याठिकाणी परप्रांतातीलही पशुपालक येथे यायचे. त्यामुळे जनावरांच्या चाºयासाठी हा परिसर ओळखला जातो. मात्र दिवसेंदिवस ज्वारीच्या पिकातून पाहिजे तसे उत्पादन निघत नसल्याने शेतकरी मका, सोयाबीन, कपाशी, कांदा या पिकांकडे वळाले आहे. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. चाºयाचे उत्पादनही कमी होऊन लाखोंची उलाढाल तर मंदावणार आहेच शिवाय, पशुधनासाठी आवश्यक असणारा कडबा प्रचंड महाग होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title:  Wheat, gram flour in the tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.