जायखेड्याच्या वारकऱ्यांना पुुण्यात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 01:57 PM2020-03-11T13:57:42+5:302020-03-11T13:58:19+5:30

जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला.

 Whackers of Jhaikheda beat in Pune | जायखेड्याच्या वारकऱ्यांना पुुण्यात मारहाण

जायखेड्याच्या वारकऱ्यांना पुुण्यात मारहाण

Next

जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटननंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांकडे तक्र ार अर्ज देण्यात आला आहे.
दर वर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीज निमित्त पंढरपुर ते देहू पायी दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये जायखेडा येथील वै. कृष्णाजी माऊलींच्या शिष्यांसह ९५० वारकरी सहभागी झाले होते. मंगळवारी दुपारी एक वाजता ही दिंडी खडकीतील किर्लोस्कर कंपनीजवळील ब्राऊन चेरी येथे पोचली. त्यावेळी मद्यपान केलेल्या पाच जणांनी वारकºयांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर दारु च्या बाटल्या फेकल्या व १८ ते २० वारकºयांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती काही वारकºयांनी जायखेडा येथील मूळ रहिवासी व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना मोबाईल द्वारे कळवताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळून दिली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात दिंडी देहूकडे रवाना करण्यात आली. या प्रकरणातील गुंड फरार झाले असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी धनंजय महाजन, केशव सोनवणे, शशिकांत बच्छाव, नानाजी बच्छाव निवृत्ती अहिरे, यशवंत गांगुर्डे, अनिल अहिरे, रविंद्र अहिरे, गंगाराम चव्हाण, भूषण बोरसे, धनंजय अहिरे, विष्णू घुले, संजय देवरे, सुनील जगताप यांच्यासह १५ वारकºयांनी पोलिसात तक्र ार दिली आहे. गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title:  Whackers of Jhaikheda beat in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक