बाळासाहेब थोरात यांचे शहरात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:15 AM2019-07-15T02:15:58+5:302019-07-15T02:16:37+5:30

कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. त

Welcome to the city of Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरात यांचे शहरात जल्लोषात स्वागत

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. समवेत आमदार निर्मला गावित, राजाराम पानगव्हाणे, संपतराव सकाळे, मधुकरराव लांडे आदींसह कार्यकर्ते.

Next

नाशिक : कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच नवीन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. रात्री उशिरा आगमन होऊनही कार्यकर्त्यांची गर्दी लक्षवेधी होती.
त्र्यंबकेश्वराचे दर्शन
त्र्यंबकेश्वर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली व ते भगवान त्र्यंबकराजचरणी नतमस्तक झाले. काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे याकरिता त्यांनी त्र्यंबकराजाला साकडे घातले. आपण केवळ दर्शनासाठीच आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत आमदार निर्मला गावित, कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, ज्येष्ठ नेते मधुकरराव लांडे, नाशिकचे नगरसेवक राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड, उमाकांत गवळी, भारत टाकेकर, कहांडोळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Welcome to the city of Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.