अटक झालेल्या आंदोलकांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:24 IST2018-08-05T18:23:18+5:302018-08-05T18:24:10+5:30
नामपूर : शेतकरी संघटनेने पुकार लेल्या दूध आंदोलनात दीपक पगार सह अन्य ११ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. १८ दिवसानंतर त्यांना जामिन मिळाल्यामुळे शनिवार दि. ४ रोजी त्यांचे नामपुर नगरीत आगमन होताचत्यांचेस्वागत करण्यात आले.

अटक झालेल्या आंदोलकांचे स्वागत
नामपूर : शेतकरी संघटनेने पुकार लेल्या दूध आंदोलनात दीपक पगार सह अन्य ११ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. १८ दिवसानंतर त्यांना जामिन मिळाल्यामुळे शनिवार दि. ४ रोजी त्यांचे नामपुर नगरीत आगमन होताचत्यांचेस्वागत करण्यात आले.
जुलै महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुधाला हमी भाव मिळावा यासाठी राज्य भर आंदोलन उभारण्यात आले होते. यात नाशिक जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते दीपक पगार, हंसराज वडघुले, युवराज देवरे, सह अन्य ११ नेत्यांना ठाणे जिल्ह्यात दुधाचा टॅँकर अडविताना दि. १६ जुलै रोजीत्यांनाअटक करु न तुरु ंगात टाकले होते. यात तब्बल १८ दिवसांनंतर त्यांना जामिन मिळाला. या नेत्याची तात्काळ सुटका करावी या साठी सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव, गोविंद पगार, सचिन अहिरराव, विनोद पाटील, चारूदत्त खैरनार यांनी तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिली होती.
शासनाचा तीव्र शब्दात निषेध
दि. ४ आॅगस्टला जेल मधुन सुटका झाल्यावर रात्री उशीरा नामपुर येथिल चार फाटा येथे दीपक पगार यांचे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पगार यांनी शासनाचा तिव्र शब्दात निषेध केला. यावेळी कांग्रेसचे प्रवीण सावंत, दयान गावचे उपसरपंच मधुकर कापडनीस, शेतकरी संघटनेचे भिका धोंडगे, चारु दत्त खैरनार यांनी मनोगत व्यक्त केली. कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, आर पी आय चे कार्यकर्ते तसेच खामलोन, उतराणे गावातील गावकरी हजर होते. नामपुर शहर संभाजी ब्रिगेड च्या वतीने या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.