बुधवारचा बाजार भरला गणेशवाडीच्या मंडईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 15:46 IST2020-04-22T15:43:13+5:302020-04-22T15:46:52+5:30
नाशिक - दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस आज भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहेमीप्रमाणे आठवडेबाजाराला प्रतिसाद मिळाला नाही.

बुधवारचा बाजार भरला गणेशवाडीच्या मंडईत
नाशिक - दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस आज भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहेमीप्रमाणे आठवडेबाजाराला प्रतिसाद मिळाला नाही.
नाशिक शहरात विविध भागात आठवडे बाजार भरतो. नाशिक गावठाणचा बाजार गोदाकाठी भरत असतो.गेल्या आठवड्यात सुरूवातीला अशाप्रकारचे आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. नंतर मात्र, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही अटी शर्तींवर त्यांना मान्यता दिली. त्यानुसार प्रत्येक दुकानदाराने मास्क लावणे आवश्यक आहे. दोन दुकानदारांमध्ये किमान पाच मीटरचे अंतर आणि ग्राहकात दोन मीटर अंतर सक्तीचे करण्यात आले होते. दुकानदारांनी ग्लोज वापरावे, हँड सॅनिटायझर वापरावे यासह विविध प्रकारच्या अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, आठवडे बाजारात अशाप्रकारच्या अटी न पाळणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेने पळवून लावले होते.
बुधवारी (दि. २२) आठवडे बाजार भरला खरा परंतु यंदा गोदाकाठी न भरता महापालिकेने गणेशवाडीतील भाजी मंडईत जागा करून दिली होती. त्यामुळे त्याठिंकाणी विक्रेत्यांनी बाजार भरवला. नेहेमीसारखा गोदाकाठी बाजार नसल्याने नागरीकांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही.