अवघ्या ११ जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:03 IST2020-04-28T20:38:37+5:302020-04-28T23:03:08+5:30
साकोरा : वधू-वर मंडळीकडील अवघ्या ११ सदस्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सचे पालन करत नांदगाव तालुक्यातील बोराळे या खेडेगावात गिरणेश्वर आश्रमात अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला.

अवघ्या ११ जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा
साकोरा : वधू-वर मंडळीकडील अवघ्या ११ सदस्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सचे पालन करत नांदगाव तालुक्यातील बोराळे या खेडेगावात गिरणेश्वर आश्रमात अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील नाना संतोष सोळुंके यांचे पुत्र भूपेंद्र आणि अनिल साहेबराव पाटील मु. पो. नेरी, वडगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव यांची कन्या माधुरी यांचा विवाह गेल्या कित्येक दिवसांपासून ठरलेला होता. परंतु लॉकडाउन लागताच लग्न पुढे ढकलणे शक्य नसल्याने अवघ्या ११ जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. ना वाजंत्री ना वºहाडी मंडळींना बोलवता वधूकडून ५, तर वराकडून ६ अशा ११ जणांच्या उपस्थितीत कुठलाही खर्च न करता तोंडाला मास्क लावून विवाह सोहळा संपन्न झाला.