शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

शस्त्रसाठा लूट प्रकरण : दाऊदचा शार्पशूटर सुका पाचासह तिघांना मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:19 IST

चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्दे न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.न्यायालयाने मोक्कांतर्गत या चौघांना सात दिवसांची कोठडी सुनावली.शस्त्रसाठा लूटूत मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यामागे मोठा घातपातचा वाजवी संशय

नाशिक : चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.उत्तरप्रदेशमधील बांदा जिल्ह्याच्या रेल्वेस्थानकापासून काही मीटर अंतरावर असलेल्या पंजाब आर्म्स सेंटर हे शस्त्रांचे दुकान बादशाह ऊर्फ सुका व त्याच्या साथीदारांनी बुधवारी (दि.१३) मध्यरात्री लुटल्याची घटना घडली होती. नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलिसांनी नाकाबंदी करून शस्त्रांचा साठा असलेल्या जीपसह सुका पाचा व त्याच्या साथीदारांना गुरुवारी (दि.१४) रात्री महामार्गावर रंगेहाथ पकडले होते. यानंतर पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या संशयितांना नाशिक ग्रामिण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. या संशयितांवर २७ डिसेंबर रोजी मोक्का कायद्यान्वये तरतुदींचा अहवाल नाशिकच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या शिवडीमध्ये राहणारा संशयित वाजीद शहा यास अजमेर येथून ताब्यात घेतले होते. या वाजिदसह तीघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मोक्कांतर्गत या चौघांना सात दिवसांची कोठडी सुनावली.बांदा, अंबोली, चांदवड, आरएके, मालेगाव पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे.विशेष मोक्का इनचार्ज न्यायालय न्यायाधीश सुरेंद्रकुमार शर्मा यांनी संशयित आरोपींना पुढील सात दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. संघटित गुन्हेगारी आहे,यापर्यंत पोलीस तपास येऊन पोहचला आहे. चांदवड येथून ताब्यात घेतलेल्या तीघांपैकी सलमान अमानुल्ला खान हा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यामुळे त्याला मोक्का कायद्यांतर्गत कारवाईतून वगळण्यात आले आहे. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्तीवाद केला.

सरकारी पक्षाचा युक्तीवादशस्त्रलुटीच्या गुन्ह्यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतचे धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाही.संशयित आरोपींमध्ये गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार जरी बद्रीनुजमान सुका पाचा असला तरी त्याने कुठल्या मोठ्या गुंडाच्या सांगण्यावरून हा कटकारस्थान रचला याबाबत तपास करणे.या गुन्हयामागे संशयितांना कोणता आर्थिक फायदा झाला याचा तपास करणे.शस्त्रसाठा इतक्या मोठ्या प्रमाणात लूटूत तो मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यामागे मोठा घातपात करण्याचा वाजवी संशय आहे. यानुसार माहिती मिळविण्यासाठी तपास करणे.

टॅग्स :MumbaiमुंबईRobberyदरोडाPoliceपोलिसTransferबदलीUttar Pradeshउत्तर प्रदेशNashikनाशिक