हम चले, तुम भी निकलो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:32 IST2019-10-20T23:21:58+5:302019-10-21T00:32:18+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे़

हम चले, तुम भी निकलो...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे़ जिल्हा निवडणूक शाखेकडून रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय साहित्य मतदान कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले़ मतदान केंद्रांपर्यंत साहित्य घेऊन जाण्यासाठी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती़ लोकशाहीच्या उत्सवासाठी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना झाले़ त्यावेळी ‘आम्ही निघालो, मतदारांनो, तुम्हीही मतदानासाठी घराबाहेर पडा’ अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली़