वंजारवाडी गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:59+5:302021-09-24T04:15:59+5:30
गोंदे दुमाला : मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक संकटांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे देखील ...

वंजारवाडी गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
गोंदे दुमाला : मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक संकटांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर लहवित प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वंजारवाडी येथे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे व ग्राम विकास अधिकारी योगेश पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी ५०० हून अधिक नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून, वंजारवाडी गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे यावेळी सरपंच शिंदे यांनी सांगितले. वंजारवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहवित प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी नाशिक पंचायत समितीचे सदस्य डॉ. मंगेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा बावीस्कर, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, पंचायत समितीचे सदस्य डॉ. मंगेश सोनवणे, आरोग्यसेवक स्वप्नील जाधव, सचिन माळोदे, मीनल मोहाडीकर, सुनिता गरुड, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच बाळू लोहरे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, ग्रामपंचायत कर्मचारी शंकर म्हसळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
स्वयंस्फूर्तीने सहभाग
गावातील वयोवृद्धांसह पात्र व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने लस घेतली. लस सुरक्षित असून, यामुळे कोरोनापासून बचाव होतो, अशी जनजागृती आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड लसीकरण वितरणाचे काम प्रगतिपथावर सुरू असून, ज्या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे, तसेच सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन लस देण्यात येणार आहे.
-----------------------------
वंजारवाडी येथे कोविड लसीकरणप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा बावीस्कर, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार व इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी. (२३ वंजारवाडी)
230921\23nsk_17_23092021_13.jpg
२३ वंजारवाडी