वारकरी परतीच्या मार्गावर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:56 IST2020-01-21T14:55:59+5:302020-01-21T14:56:26+5:30
त्र्यंबकेश्वर : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे दर्शन घेवून दिंडीने आलेले राज्यभरातील वारकरी, भाविक आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.त्यामुळे शहर पुन्हा गजबजून गेले होते.

वारकरी परतीच्या मार्गावर...!
त्र्यंबकेश्वर : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे दर्शन घेवून दिंडीने आलेले राज्यभरातील वारकरी, भाविक आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.त्यामुळे शहर पुन्हा गजबजून गेले होते.
अनेक वारकऱ्यांनी बरोबर आणलेल्या ट्रॅक्टर किंवा ट्रकसह मिळेल त्या वाहनाची मदत घेतली. वारकरी दिंडीबरोबर छोटे मंदीर, पालखी, छोटा रथ जातांना आपल्या ट्रक-ट्रॅक्टरमध्ये सुरक्षित घेउन जातांना दिसत होते. परिवहन महामंडळाच्या जव्हार फाटा बस स्थानकात मोठी गर्दी झाली होती. त्यात खाजगी कार, रिक्षा, टेंपोच्या वर्दळीने बसेसची तारांबळ उडत होती. स्थानकप्रमुख एन एच जाधव ध्वनीक्षेपकावरून भाविकांना मार्गदर्शन करीत होते.
दरम्यान काही मानाच्या दिंड्या आज देखील मुक्काम करतात.कारण संत निवृत्तीनाथ मंदीरात या मानाच्या दिंडी मानक-यांचा सत्कार नारळ प्रसाद देऊन केला जातो. त्यांच्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे स्नेहभोजन आयोजित केले जाते. ते भोजन केल्याशिवाय दिंडी मानकरी परत जात नाहीत. यावेळेस नारळ प्रसाद देण्याचा मान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांचा आहे. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते.