लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाणीपुरवठा विषयक विविध कामांची दुरुस्ती करण्यासाठी शनिवारी (दि. १०) महावितरण कंपनीचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने नाशिकरोडसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील महावितरण कंपनीची एक्स्प्रेस फिडर लाइनची देखभाल व दुरुस्ती, शिवाजीनगर जलशुद्धिकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट्सचे व्हॉल्व्ह दुरुस्ती, ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्ती, चेहेडी पंपिंग स्टेशन येथील उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, कालिका पंपिंग स्टेशनमधील नवीन पॅनलची व केबलची जोडणी, कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्ती, गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील ९०० मिमी. व्यासाच्या रायझिंग मेनवरील व्हॉल्व्हची दुरुस्ती आदी कामे करण्यासाठी महावितरण कंपनीचा वीजपुरवठा सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहर व नाशिकरोडचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
शहरात आज सर्वत्र पाणीपुरवठा राहणार बंद
By admin | Updated: June 10, 2017 01:52 IST