शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

गावठाणात आता टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:17 IST

पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली.

ठळक मुद्देमहापौरांचे आदेश : कपातीमुळे अनेक भागांवर अन्याय, सात तास जोरदार चर्चा

नाशिक : पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली. अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि विस्कळीत नियोजन यामुळे महापालिकेच्या महासभेत सलग सात तास वादळी चर्चा करून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले, तर महापौर रंजना भानसी यांनी सर्व अभियंते आणि विभागीय अधिकाºयांना केबीनमधून बाहेर पडा आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन समस्या सोडवा, असे आदेश महापौर रंजना भानसी दिले. त्याचबरोबर गावठाणात छोट्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे महत्त्वाचे आदेशही त्यांनी दिले.महापालिकेची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१९) पार पडली. यावेळी पाणीकपातीचा महत्त्वाचा प्रस्ताव महासभेवर होता. वास्तविक, पाणीकपातीचा निर्णय अगोदरच झाला होता. त्यानंतर फेरनिर्णयदेखील झाल्यानंतरही हा प्रस्ताव महासभेवर असल्याने नगरसेवकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कपातीमुळे कोणत्या भागावर अन्याय झाला, त्याचा पाढाच नगरसेवकांनी मांडला.नलावडे यांना धरले धारेवरपाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. ते जलशुद्धीकरण केंद्रांवर जात नाही तसेच केबीनमध्ये बसून नियोजन करतात, असे आरोप करण्यात आले. महापालिका दररोज ४६० दशलक्ष लिटर्स पाणी उपसा करते त्यातील १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचे बिलिंग होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी उघड केला. त्याबाबतदेखील नलावडे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई