शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 01:45 IST2021-11-26T01:44:18+5:302021-11-26T01:45:09+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी (दि. २७) करण्यात येाणार असल्याने या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

The water supply to the entire city was cut off on Saturday | शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी (दि. २७) करण्यात येाणार असल्याने या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्र्यंबकरोडवरील आयटीआयसमोर मेघा इंडस्ट्रीज कंपाऊंडलगत सहाशे मिमी व्यासाची शुद्ध पाण्याची वाहिनीची दुरुस्ती करतानाच संपूर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन रस्त्यावरील ऊर्ध्ववाहिनी (रायझिंग मेन) पाइपलाइनला गळती सुरू झालेली आहे. त्यामुळे तिच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच मुकणे धरण येथील २२० केव्ही फीडर लाइनकरिता (विद्युतवाहिनी) शुक्रवारी (दि. २७) महावितरण विभाग शटडाऊन करणार आहे. त्यामुळे यादिवशी संपूर्ण दिवस नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहील व रविवारी (दि. २८) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: The water supply to the entire city was cut off on Saturday