त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यंदा मार्चमध्येच उष्मा जाणवू लागला आहे.त्यामुळे पाण्यासाठी जेथे माणसांना भटकंती करावी लागते, तेथे पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी ! त्याच पार्श्वभूमीवर वाघेरा घाटात जलपरिषदेद्वारे खास पशुपक्ष्यांसाठी जागोजागी निवारा, चारा, पाण्याची सोय करण्यात आली आहे. परिषदेचा प्रत्येक सभासद या कामात हिरिरीने सहभाग घेतो. वाघेरा घाटात नाशिक हरसूल राज्य महामार्गावरील जवळपास आठ किलोमीटरचे घाट आहे. याच घाटात ७० ते ८० ठिकाणी जल परिषद मित्रांनी स्वखर्चाने चारा पाण्याची व्यवस्था केल्याने घाटातून प्रवास करतांना या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो. अशा वेळेस मनाला प्रसन्न वाटते. अजुन खैराई किल्ला, अंबोली घाट, हरसूल परिसरातील डोंगर माथ्यावर जेथे पशुपक्ष्यांची आश्रयस्थान आहेत, तेथे देखील जलपरिषद मित्रांचा असाच उपक्रम करण्याचा मानस आहे. घाटमाथ्यावरून खाली हरसूलकडे प्रवास करतांना संपूर्ण परिसर डोंगर झाडांनी वेढलेला आहे. या परिसरात जैव विविधता वनौषधी जंगली फळे मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. दरम्यान याच जलपरिषद मित्रांनी हरसूल परिसरातील अनेक गावे वाड्या पाडे येथे श्रमदानातून जवळपास १०१ वनराई बंधारे योजना राबवून यशस्वी करून दाखवली. या उपक्रमात जलपरिषदेच्या देवचंद महाले, पोपट महाले, प्रकाश पवार, अरुण बागडे, सीताराम पवार, अनिल बोरसे, दिनेश लहारे, विशाल महाले, विष्णू पवार, दिलीप पवार, नितीन पाडवी, मधुकर हिरकुड, विकास आवारी, अशोक तांदळे, पांडुरंग तांदळे, विठ्ठल मौळे, रोहिदास बोरसे, केशव पवार आदींनी यात सहभाग घेतला आहे. (१८ टीबीके ४)
वाघेरा घाट परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:18 IST
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यंदा मार्चमध्येच उष्मा जाणवू लागला आहे.त्यामुळे पाण्यासाठी जेथे माणसांना भटकंती करावी लागते, तेथे पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी !
वाघेरा घाट परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था
ठळक मुद्देहरसूल परिसरातील जल परिषद मिशनचा असाही अनोखा उपक्रम !