उसवाडला पाणीटंचाई ; महिला व पुरुषांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:43 IST2019-02-14T18:42:55+5:302019-02-14T18:43:21+5:30
चांदवड तालुक्यातील उसवाड येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, येथे दररोज टॅँकरने दोन खेपा करण्याची मागणी करत उसवाड येथील महिला व पुरुषांनी चांदवड पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले, तर तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांंना निवेदन दिले.

चांदवड तालुक्यातील उसवाड येथे पाणीटंचाई असल्याने त्वरीत टॅँकरद्यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ.शरद मंडलिक यांना देतांना उसवाड ग्रामस्थ व महिला दिसत आहेत
चांदवड : तालुक्यातील उसवाड येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, येथे दररोज टॅँकरने दोन खेपा करण्याची मागणी करत उसवाड येथील महिला व पुरुषांनी चांदवड पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले, तर तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांंना निवेदन दिले. उसवाड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. आसपास शाश्वत पाणीस्रोत नाही, ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही तर ग्रामविकास अधिकारी बरेच दिवस गावाकडे येत नाही. बरीच कामे खोळबंली असून, उसवाड येते त्वरित टॅँकरच्या दोन खेपा द्याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांनी सांगितले की, उसवाड व राहुड या दोन गावासाठी राहुड धरणातून पाणीपुरवठा योजना आहे. काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे. या योजनेची पाइपलाइन तुटल्याने ती तात्काळ दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे ती लवकर दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.