शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

बंधा-यात आवर्तनाचे पाणी, नामपूरकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 3:52 PM

शेवटचे आवर्तन : महिनाभराचा पाणीप्रश्न सुटला

ठळक मुद्देयामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर भरली असून नविन विहीरीतही पाणी उतरले आहे.

नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दीड कोटी रु पये खर्चून तयार केलेल्या केटिवेअर योजनेचे काम पूर्ण झाले असून मोसमनदीचे या वर्षाचे शेवटचे आवर्तनाचे पाणी या केटिवेअरमध्ये आल्यामुळे नामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर भरली असून नविन विहीरीतही पाणी उतरले आहे. त्यातच नदीकाठावरील इंधनविहीरीना पाणी उतरायला सुरु वात झाल्याने पावासाळा सुरु होईपर्यंत महिनाभरासाठी का होईना नामपूरकरांना दिलासा मिळणार आहे.केटीवेअरला पाणी आल्यामुळे सधनलोक जमिनी घेऊन येथून पाणी इतरत्र नेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मूळ हेतू बाजूला राहिल. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) श्रीराम मंदिरात ग्रामस्थांची सभा नामपूरचे सेवानिवृत्त अध्यापक शरद नेरकर यांचे अध्यक्षस्थानी घेण्यात आली. सभेत पाणी व वाळूतस्करी यावर चर्चा करण्यात आली. यात काही निर्णय घेण्यात आले. नदीकाठापासून १०० मीटर अंतरापर्यत नविन विहीर खोदू नये. आढळल्यास ग्रामपंचायतीने कारवाई करावी. मोठा बंधारा ते नकट्या बंधा-यापर्यंत वाळूउपशावर बंदी घालावी. शिवारातले पाणी शिवारातच ठेवावे. पाईपलाईन किंवा टॅँकरमधून शिवाराबाहेर पाणी नेऊ नये आदी, महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. यावेळी केटिवेअरसाठी प्रयत्न करणारे डॉ. गिरासे यांचा गौरव करण्यात आला.विविध सूचनाग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच दक्ष रहावे असे आवाहन नामपूरचे सामाजिक कार्यकर्ते दिपक सावंत व संभाजी सावंत यांनी केले . तर नदीची नांगरणी केल्यास पाणीपातळी वाढण्यास मदत होईल यावरही चर्चा झाली. चर्चेत बाजीराव सावंत, किरण अहिरे, दिपक सावंत ,संभाजी सावंत, प्रविण सावंत,अशोक सुर्यवंशी , कविता सावंत, राजेंद्र सावंत, प्रमोद सावंत, विनोद सावंत. अश्पाक पठाण आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी