लासलगाव बाजार समिती आवारात पाणीच पाणी, शिवनदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 22:36 IST2021-09-28T22:36:26+5:302021-09-28T22:36:52+5:30

लासलगाव : मंगळवारी पहाटेपासूनच जोरदार हजेरी लावल्यामुळे लासलगाव परिसर जलमय झाला, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले.

Water only in Lasalgaon Bazar Samiti premises, flood to Shivandi | लासलगाव बाजार समिती आवारात पाणीच पाणी, शिवनदीला पूर

लासलगाव बाजार समिती आवारात पाणीच पाणी, शिवनदीला पूर

ठळक मुद्देअनेक दुकानात पावसाचे पाणी घुसले.

लासलगाव : मंगळवारी पहाटेपासूनच जोरदार हजेरी लावल्यामुळे लासलगाव परिसर जलमय झाला, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले.

बाजार समितीचे जुने आवार लासलगाव बस आगाराच्या आवारासह शिवाजी चौक, स्टेशन रोड, कोटमगाव रोड यांसह सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने वाहने अडकून पडली. अनेक दुकानात पावसाचे पाणी घुसले.

या पावसाने शिवनदीला जोरदार पूर आला असून पिंपळगावनजीक पुलाजवळ पाणी पोहोचले. दिवसभरात १०८ मि.मी. पाऊस झाला असून या हंगामात कालअखेर ५८३ मि.मी. पावसाची नोंद लासलगाव येथील बाजार समितीतील पर्जन्यमापकावर झाली आहे.

 

Web Title: Water only in Lasalgaon Bazar Samiti premises, flood to Shivandi