शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:38 IST

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : मनमाड येथील संपर्क यात्रेत धनराज महाले यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ या मनमाड येथे आलेल्या संपर्क यात्रेत ते बोलत होते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सराकारच्या कारभारावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते दिल्लीमधे नसल्याने शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचे पवार यांनी सांगितले.याप्रसंगी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी मंत्री फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष इश्वर बालबुद्धे, माजी खासदार समीर भुजबळ, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, संजय चव्हाण, भारती पवार, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र पगारे, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवारछगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसमधे प्रवेश केला. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता राष्टÑवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी पक्षप्रवेश केला असल्याचे महाले यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले.देशातील प्रश्नांवरच चर्चाया निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये विविध वक्त्यांची भाषणे झाली; मात्र या भाषणांमध्ये सर्वच नेत्यांनी स्थानिक वा राज्याच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची धोरणे यावरच टीकेची झोड उठविली. या सभेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वीच्या भाषणांची व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांचा खोटेपणा दाखवून दिला गेला.शरद पवार यांना दिल्लीमधे ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे राष्टÑवादी कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.सध्या सरकारकडून रोज नवीन नवीन घोषणा करण्यात येत असून निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या घोषणा म्हणजे जनतेची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. कार्यक्रमाचे

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवार