पंधरा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:47 PM2019-08-10T22:47:32+5:302019-08-10T22:48:07+5:30

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.

Water for fifteen days | पंधरा दिवसांआड पाणी

पंधरा दिवसांआड पाणी

Next
ठळक मुद्दे येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू


 

मनमाडकर तहानलेलेच । ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

गिरीश जोशी

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.
सध्या जिल्ह्यासह सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नदीनाल्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला आणि बळीराजाला यावर्षी दिलासा मिळणार अशी आशा वाटत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मनमाड शहराची पाणीटंचाईच्या संकटातून अजूनही सुटका झालेली नाही. आजही शहरातील अनेक भागांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कूपनलिका व विहिरी कोरड्या असल्याने पाण्याची शोधाशोध करावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईचे भोग अजूनही संपलेले नाहीत. तालुक्यात काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असला तरी शहरासह पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पानलोटक्षेत्रामध्ये पाऊस झालाच नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असला तरी मनमाड परिसरात मात्र पावसाची बुुरबूर सुरू आहे. परिणामी पडत्या पावसातही मनमाडकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा फेरा आहे तसाच कायम आहे. पावसाअभावी विहिीरींना अद्याप पाणी आलेले नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. परिसर सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पालखेड धरणातून मुबलक प्रमाणात मिळणाºया पूरपाण्यामुळे पालिकेचा पाटोदा साठवणूक तलाव भरून घेण्यात आला आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या धरणात अल्पपाणी साठा जमा झाला असला तरी पाटोदा साठवण तलावातून चार पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून वागदर्डी धरणात साठवण्यात येत आहे. वागदर्डीमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करून दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असला तरी मनमाडकरांवर मात्र पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.मनमाड परिसरात पावसाने दडी मारल्याने पाटोदा साठवण तलावातून वागदर्डी धरणात पाणी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू आहे.
- पद्मावती धात्रक,
नगराध्यक्ष, मनमाड

Web Title: Water for fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.