डोंगरगाव विद्यालयात जल दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:14 IST2021-03-22T21:26:45+5:302021-03-23T02:14:21+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील हभप कृष्णाजी माऊली विद्यालयात जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.

Water Day celebration at Dongargaon Vidyalaya | डोंगरगाव विद्यालयात जल दिन साजरा

डोंगरगाव विद्यालयात जल दिन साजरा

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील हभप कृष्णाजी माऊली विद्यालयात जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुख्याध्यापक एस.के. सावंत यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे मानवी जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. आगामी काळातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाच्या उपशिक्षका एम.एम. चाबुकसवार यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक ह्यजल प्रतिज्ञाह्ण दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीविषयीच्या घोषणा दिल्यात. यावेळी मुख्याध्यापक एस.के. सावंत, ई. एम. सावळा, एन. के. आहेर, आर.डी. मगर, एम.एम. चाबुकसवार, एस.जे. सावंत, डी.के. देवरे, डी.ए. ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Water Day celebration at Dongargaon Vidyalaya

टॅग्स :Nashikनाशिक