शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुलांवर लक्ष ठेवा, कॉलेजच्या आवारात विकलं जातंय ड्रग्ज; एमडीची विक्री करताना तरुणाला अटक

By अझहर शेख | Updated: September 9, 2023 18:14 IST

सामनगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ एम. डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे.

नाशिकरोड: सामनगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ एम. डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीतून ५० हजार रुपयांची १२.५ ग्रॅम इतकी एम. डी. पावडर जप्त करण्यात आली आहे. अल्पवयीन मुले या नव्या अमली पदार्थाच्या आहारी जात असून, दिवसेंदिवस त्यांच्याभोवती एम. डी.चा फास अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. यामुळे अशा कारवाया सातत्याने होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

एम. डी. पावडर, कुत्ता गोली, व्हाइटनर, बटन गोली, गांजासारख्या विविध अमली पदार्थांची सर्रासपणे विक्री नाशिकरोडसह विविध भागांमध्ये केली जात आहे. महाविद्यालयीन युवक-युवती यासारख्या अमली पदार्थांच्या व्यसनात अडकत चालल्याचे दिसून येते. मागील काही महिन्यांपासून या घातक अशा अमली पदार्थांच्या विक्रीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, असे नागरिकांनी सांगितले. शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये सर्रासपणे अशा अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे व सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईसाठी रवाना केले.

गुरूवारी (दि. ७) दुपारी सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सापळा रचून संशयित गणेश संजय शर्मा (२०, रा. सामनगाव रोड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच दोन मोबाइल, १ हजार ७०० रुपये असा एकूण ७१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयित गणेश शर्मा याला नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आता अमली पदार्थविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. झोपडपट्ट्या बनले केंद्रशहर परिसरामध्ये युवा पिढी एम. डी. व कुत्ता गोळीसारख्या अमली पदार्थांमुळे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेसोबत इतर प्रश्नदेखील गांभीर्याने निर्माण होऊ लागले आहेत. शरीराला अत्यंत घातक असलेल्या एम. डी., कुत्ता गोळी, गांजा आदी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील काही झोपडपट्टी परिसर व इतर भागांत अशा अमली पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे. हे अमली पदार्थ शहरात पुरविणाऱ्या मुख्य पुरवठादारापर्यंत पोलिसांनी पोहोचण्याची गरज आहे.

टॅग्स :NashikनाशिकDrugsअमली पदार्थArrestअटकCrime Newsगुन्हेगारी