तासाभरात धुवाधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:10 AM2020-10-19T01:10:40+5:302020-10-19T01:11:01+5:30

शहर व परिसरात दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांत पावसाचा जोर अधिक राहिल्याचे  दिसून आले. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

Wash in an hour | तासाभरात धुवाधार 

तासाभरात धुवाधार 

Next
ठळक मुद्दे३२.३ मिलीमीटर पाऊस :  रस्ते जलमय; परतीच्या पावसाने झोडपले

नाशिक : शहर व परिसरात दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांत पावसाचा जोर अधिक राहिल्याचे  दिसून आले. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सर्वच मोकळ्या भुखंडांना तलावाचे स्वरुप प्रा्प्त झाले होते. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू अरबी समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील ४८ तासांत ओमानच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे. 
यामुळे गुजरातसह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. चार दिवसांपूर्वीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. 

उपनगरांत  झाडे कोसळली
शहरी भागात पावसाचा जोर कमी होता, यामुळे कोठेही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या नाहीत; मात्र उपनगरांमध्ये सातपूर, उपनगर, अंबड लिंकरोड, जेलरोड या भागांत झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली. झाडे कोसळल्याने रस्ते बंद झाले होते; मात्र अग्निशमनदलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कापून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केलेे.

Web Title: Wash in an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.