Warning the election system with the possibility of rain | पावसाच्या शक्यतेने निवडणूक यंत्रणा सतर्क

पावसाच्या शक्यतेने निवडणूक यंत्रणा सतर्क

ठळक मुद्देकाहीशी चिंता : डोंगराळ भागात पावसाचा अंदाज

नाशिक : मतदानाला प्रत्यक्ष चोवीस तास शिल्लक राहिले असताना हवामान खात्याने नाशिकमध्ये पावसाचा अंदाज वर्तविल्याने निवडणूक यंत्रणेला चिंता लागली आहे. जिल्ह्णातील डोंगरी भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्याने इगतपुरीसह सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण आदी आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांचा जिल्हा प्रशासनाने आढावा घेतला. तात्पुरते मतदान केंद्र उभारताना केंद्राच्या मजबुतीची काळजी घेण्याचे आदेशदेखील निवडणूक शाखेने दिले आहेत.
अवघ्या दोन दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली असून, निवडणूक शाखेकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, जिल्ह्णातील ४,४४६ मतदान केंद्रांवर येत्या सोमवारी (दि.२१) मतदान होणार आहे. जिल्ह्णात १३३ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. परंतु आता पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्यामुळे निवडणूक शाखेला केंद्राची काळजी पडली आहे. यापूर्वी घेतलेल्या आढाव्यात सर्वच मतदान केंद्रे सक्षम असल्याचे आणि ज्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात केंद्र उभारण्याची गरज होती तेथेदेखील केंद्रे उभारण्यात आलेली आहे.
नांदगावमध्ये १, मालेगाव मध्यला ५७, मालेगाव बाह्ण मध्ये ८, बागलाण १, येवला येथे २, सिन्नरला १२, निफाड १, नाशिक पूर्व १६, नाशिक मध्य १, नाशिक पश्चिममध्ये २६, देवळालीत ८ याप्रमाणे
तात्पुरत्या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
इगतपुरीत वापरणार वायरलेस यंत्रणा
जिल्ह्णातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात एकूण १९ मतदान केंद्रे असे आहेत की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मोबाइलची रेंज नाही. अशा ठिकाणी अधिकाऱ्यांना वायरलेस यंत्रणा पुरविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जाणार आहे, असे असतानाही अतिदुर्गम भागात वायरलेस यंत्रणाही काम करू शकत नाही अशा ठिकाणी वेब कास्टिंग करणार आहेत. इगतपुरीतील २९ केंद्रांवर अशाप्रकारची व्यवस्था केली जाणार असून, या माध्यमातून थेट निवडणूक आयोगाचे लक्ष या केंद्रांवर राहाणार आहे.

Web Title: Warning the election system with the possibility of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.