लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील विसापूर येथे वारकरी महामंडळाच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय डुकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर उपस्थित होते.वारकरी महामंडळाच्या माध्यमातून वारकरी संघटन मजबूत करून सर्वांना बरोबर घेऊन काम करू, सर्व वारकरी बांधवांनी महामंडळाचे सदस्य होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आहेर यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी विठ्ठल शेलार यांच्या वतीने प्रवचन व धार्मिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ वाटप करण्यात आले. लवकरच तालुक्यातील शंभर गावांना अशाप्रकारचे व्यासपीठ देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी वारकरी भवनासाठी योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन दिले. बनकर यांनी, दिंडीसाठी चार पाल व संभाजी पवार यांनीही चार पाल देण्याचे यावेळी जाहीर केले. पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी पंचायत समितीकडून प्रत्येक गावास भजनी साहित्य देण्याचे आश्वासन दिले. सर्व पदाधिकाऱ्यांचा वाल्मीकराव पूरकर व विसापूर ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास बाळासाहेब कबाडे, साहेबराव आहेर, बाबा डमाळे, तात्या लहरे, श्रावण जगताप, नारायण गुंजाळ, हरिश्चंद्र भवर, राजेंद्र काळे, अरविंद शिंदे, सुभाष बोरोडे, नारायण काळे, माणिकराव रसाळ, लक्ष्मण कदम, विलास ढोमसे, गोरख अहिरे, सुरेश बढे, भागवत शेलार उपस्थित होते.
वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:48 IST
येवला : तालुक्यातील विसापूर येथे वारकरी महामंडळाच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय डुकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर उपस्थित होते.
वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार
ठळक मुद्देप्रवचन व धार्मिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ वाटप करण्यात आले.