शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

वारकऱ्यांची आषाढी झाली घरीच साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:24 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला जाणाºया पायी दिंड्या रद्द झाल्याने वारकऱ्यांची आषाढी एकादशी घरीच साजरी झाली. यंदा विठ्ठल मंदिरांत केवळ पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत. मात्र अनेक ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गदी करूनये आवाहन करण्यात आल्याने सर्वांना मंदिरांच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला जाणाºया पायी दिंड्या रद्द झाल्याने वारकऱ्यांची आषाढी एकादशी घरीच साजरी झाली. यंदा विठ्ठल मंदिरांत केवळ पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत. मात्र अनेक ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गदी करूनये आवाहन करण्यात आल्याने सर्वांना मंदिरांच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच सण-समारंभ आणि यात्रोत्सव रद्द झाले आहेत. त्यामुळे साहजिकच दरवर्षी मंदिरात भाविकांच्या गर्दीत रंगणारी आषाढी यंदा विठूनामाच्या गजराविना काहीशी सुनी-सुनी वाटत होती.काही मंदिरात केवळ दहा-बारा भाविकांनाच मंदिराच्या सभामंडपात उभे राहून दर्शन घेता आले.यंदा वारी चुकली रे हरी, अशी खंत अनेक वारकºयांनी व्यक्त केली. जुने नाशिक, पंचवटी, सिडको, इंदिरानगर, गंगापूररोड, कॉलेजरोड आदी ठिकाणाच्या मंदिरात वर्षी आषाढीला भजन-कीर्तन सोहळा रंगतो. यंदा मात्र केवळ अभिषेक आणि शोडषोपचार पूजा करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी हरिनामात गजबजणारी मंदिरे आज मात्र सुनी-सुनी वाटत होती.तर जुने नाशिकच्या काझीपुºयातील नामदेव मंदिर, मुरलीधर मंदिराशेजारील विठ्ठल मंदिर, काळाराम मंदिरानजीकचे विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि कॉलेजरोडवरील विठ्ठल रखुमाई मंदिरातदेखील भाविकांना दुरूनच दर्शन घेता आले. दरम्यान, विठ्ठल मंदिरात दर्शनाला येणाºया भाविकांसाठी सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, यासाठी सर्व दक्षता घेण्यात आली असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. दरम्यान, उपवासाठी फराळाचे पदार्थ आणि फळे घेण्यासाठी बाजारामध्ये, दुकांनात गर्दी दिसून आली.(चौकट)केवळ पूजाआर्चा

टॅग्स :NashikनाशिकAshadhi Ekadashiआषाढी एकादशी