शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 09:20 IST

‘त्यांना एका समाजाची बाजू घेणे शोभते का?’, ‘आम्ही बोलावे एवढी त्यांची लायकी नाही’

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी (नाशिक) : आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल करत असताना छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती आपण केवळ मराठा समाजाची बाजू घेता, हे आपणाला शोभत नाही, अशी टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली.

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ओबीसींसाठी ३५ वर्षे लढलो आणि यापुढेही लढेन. त्यामुळे कोणीही अन्याय केला तर सहन करणार नाही असे सांगून  फुले, शाहू, आंबेडकर यांना जपणारे शाहू महाराज बघा आणि तुम्ही काय करता? तुम्ही एका समाजाची बाजूच कशी घेऊ शकता, असा सवाल त्यांनी यावेळी केला. 

मी आजपर्यंत छगन भुजबळ यांना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार समजत होतो. परंतु त्यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत हीन भाषा वापरत टिप्पणी केली. भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. - संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जी व्यक्ती सरकारच्या मोठ्या पदावर बसली असताना कायदा पायदळी तुडवत आहे, त्या व्यक्तीची लायकी राज्यातील लोकांनी ओळखली आहे. पण मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, अशा शब्दात मराठा क्रांतियोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. 

सातारा येथील गांधी मैदानावर शनिवारी जाहीर सभेत जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आधी तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, हे सर्वांना ठाऊक आहे. तुमच्याकडे काहीही नव्हते आणि एवढी संपत्ती कशातून आली, हे सगळ्यांना माहीत आहे. 

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण गरम होत आहे, पण याचा राजकीय वापर करण्यात येऊ नये. मी हात जोडतो, पण आरक्षणावरून कोणत्याही नेत्याने जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये. जातीनिहाय जनगणनेनंतर सर्वांना आरक्षण देण्यात यावे.- उदयनराजे भोसले, खासदार

 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील