वणीत लाल कांद्याला ६१७१ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 21:17 IST2020-11-20T21:16:57+5:302020-11-20T21:17:23+5:30
वणी : येथील उपबाजार आवारात कांद्याची १४०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला ५५०० रुपये, तर लाल कांद्याला ६१७१रुपये दर मिळाला.

वणीत लाल कांद्याला ६१७१ रुपये दर
वणी : येथील उपबाजार आवारात कांद्याची १४०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला ५५०० रुपये, तर लाल कांद्याला ६१७१रुपये दर मिळाला. दिवाळीच्या सुटीनंतर सुरू झालेल्या वणी उपबाजारात कांदा खरेदी-विक्रीच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीस गती आली असून, उन्हाळ व लाल कांद्याला मिळालेल्या दरामुळे उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. उपबाजारात शुक्रवारी १२०० क्विंटल उन्हाळ कांदा, तर २०० क्विंटल लाल कांद्याची अशी एकूण आवक ११४ वाहनातून करण्यात आली. उन्हाळ कांद्याला मिळालेला दर असा कमाल ५५०० किमान ३०००, तर सरासरी ४८५० रुपये प्रति क्विंटल, तर लाल कांद्याला ६१७१ कमाल ३००० रुपये किमान, तर ४५०० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर मिळाला. उत्पादकांनी या व्यवहारप्रणालीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुर्की व अफगणिस्तानातील परदेशी कांदा पिंपळगावच्या बाजार समीतीत आल्यानंतर आकारमान, चव व रंगात असलेल्या तुलनात्मक फरकामुळे तितकीशी मागणी नसल्याने तो कांदा मागे पडला व पुन्हा स्थानिक कांद्याला पसंती मिळाली मागणी वाढली त्यामुळे कांदा खरेदी-विक्री व्यवहारप्रणालीत गतिमानता आली आहे. कांदा व टमाटा याना समाधानकारक दर सध्या मिळत असल्याने उत्पादकांना दिलासा व आधार मिळाला आहे.