पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:11 IST2018-04-11T23:11:03+5:302018-04-11T23:11:03+5:30

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो.

Wandering water | पाण्यासाठी भटकंती

पाण्यासाठी भटकंती

ठळक मुद्देयेवला : टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तालुकावासीयांची मागणीअजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाड्यावस्तीवर पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. राजापूर येथील वडपाटी पाझर तलाव हा काही वर्षांपूर्वी फुटला होता.
राजापूर येथील ग्रामस्थांनी व नरेंद्र दराडे यांनी मदत केल्याने वडपाटी पाझर तलावात आजही पाणी आहे. ग्रामपंचायतीने वडपाटी येथे पाणीपुरवठा योजना राबवून राजापूरचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. राजापूर व वाड्यावस्त्यांवर त्वरित टॅँकर सुरू करावा, अशी मागणी शंकराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, गोकुळ वाघ, लक्ष्मण घुगे, रवींद्र अलगट, सुभाष अलगट, सागर अलगट, प्रशांत वाघ आदींनी केली आहे.टँकरचे प्रस्ताव : अडकले लालफितीतयावर्षी पाऊस कमी झाल्याने लोहशिंगवे येथील विहीर व बोअरवेल आटल्याने राजापूर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गरिबांना कामे नसल्यामुळे गरिबांच्या नशिबी पाणीटंचाई ही दरवर्षी पाचवीला पूजलेली आहे. राजापूर ग्रामपंचायतीने टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.

Web Title: Wandering water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.