भटक्या, मोकाट कुत्र्यांची ग्रामीण भागात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:00 IST2018-09-24T16:59:09+5:302018-09-24T17:00:33+5:30

भटक्या, मोकाट कुत्र्यांची ग्रामीण भागात दहशत
धारणगांव : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवतांना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्याचवेळी कष्टाने जगविलेली पिके या मोकाट कुत्र्यांकडुन नाश केली जात आहेत. खेडलेझुंगे, धारणगांव, रुई परिसरातील कांद्याची रोप, इतर शेतातील पिकांची या कुत्र्यांकडुन नासाडी होत आहे. या भटक्या कुत्र्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. बरेच शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी मजुर ठेवत आहे. या भटक्या जीवांकडुन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा फटका शेतकरी वर्गाला होत आहे. या कुत्र्यामुळे पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. याकडे स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तरित्या गांभीर्याने लक्ष देवुन शेतकऱ्यांचे कसे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. तसेच या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
भटक्या व मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावे घेतल्याचे तसेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात या भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. ही मोकाट कुत्री शहरातून गावाच्या वेषीवर सोडून दिली जात असल्याचे बालले जात आहे.