शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भिंत कोसळून एक ठार; सहा जखमी

By admin | Updated: July 31, 2014 00:53 IST

पाथर्डी फाटा : बांधकाम सुरू असलेल्या हरी-विश्व सोसायटीतील घटना

इंदिरानगर : मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून पप्पू यादव हा मजूर ठार झाला, तर उर्वरित सहा गंभीर जखमी झाले आहेत़ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ पाथर्डी फाटा परिसरात हरी-विश्व या सोसायटीचे बांधकाम सुरू आहे़ या बांधकामासाठी अनेक मजूर या ठिकाणी झोपडी बांधून राहत असून, सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कडेलाच त्यांच्या झोपड्या आहेत़ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या सोसायटीची संरक्षक भिंत अचानक कोसळली़ यामध्ये पप्पू उमेश यादव याचा मृत्यू झाला, तर शिवभजन, रामभजन, छोटू (पूर्ण नाव माहिती नाही), राकेश गौर, धर्मराज शर्मा, मनोरथ हे जखमी झाले़ यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर पाथर्डी फ ाट्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व कामगार हे उत्तर प्रदेश तसेच बिहारमधील असून, १८ ते २० वयोगटातील आहेत़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)