शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन आयोगाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:22 AM

शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून, एप्रिल महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक : शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून, एप्रिल महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागातील अर्धवेळ ग्रंथपालांना मात्र सातव्या वेतन आयोगाच्या लाभाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी अर्धवेळ ग्रंथपाल सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित राहिलेला आहे.शासनाकडून प्रत्येकवेळी वेतन आयोगात अर्धवेळ ग्रंथपालांना विलंबाने लाभ लागू करण्यात आला असून, यावेळी पूर्णवेळ ग्रंथपालांसोबतच लाभ मिळेल, अशी अपेक्षा अर्धवेळ ग्रंथपालांना होती. पूर्णवेळ ग्रंथपालांसोबतच अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन आयोगाचा लाभ मिळावा, अशी मागणी ग्रंथालय शिक्षक परिषदेने शासनाकडे केलेली आहे. मुळात शासनाच्या अधिसूचनेतच पूर्णवेळ कर्मचारी या शब्दप्रयोगासोबतच अर्धवेळ शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनाही वेतन आयोगाचा लाभ लागू असेल असे नमूद असते तर अर्धवेळ ग्रंथपालांना न्याय मिळू शकला असता. परंतु, तसा उल्लेख नसल्याने शासनाला अर्धवेळ ग्रंथपालांसाठी स्वतंत्र अध्यादेश काढावा लागत असल्याने या प्रक्रियेला एप्रिलनंतरही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळीही अर्धवेळ ग्रंथपालांच्या वाटेला प्रतीक्षा, विलंब आणि निराशाच असल्याची महाराष्ट्र ग्रंथालय शिक्षक परिषदेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.सेवाशर्तीचा लाभ मिळावाशंभर टक्के अनुदानित शाळेतील पद असूनही केवळ अर्धवेळ पद म्हणून कायमच ग्रंथपालांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र ग्रंथालय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विलास सोनार यांनी केला आहे. अर्धवेळ ग्रंथपालांना सेवाशर्तीचा लाभ दिला जात नसल्यामुळे त्यांना कालबद्ध वेतनश्रेणी, घरभाडे भत्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ, भविष्य निर्वाह निधी योजना, सेवानिवृत्ती वेतन, असे कोणतेही लाभ मिळत नाही. महागाई भत्त्याशिवाय कोणताही लाभ मिळत नाही ही अर्धवेळ ग्रंथपालांच्या बाबतीत मोठी शोकांतिका असून, अर्धवेळ ग्रंथपालांना सेवाशर्तीचा लाभ त्वरित लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.वेतन आयोगाच्या  दुसऱ्या खंडाची प्रतीक्षाबक्षी समितीने शासनास आत्तापर्यंत वेतन आयोगाचा पहिला खंड सादर केलेला आहे. दुसºया खंडात यापूर्वीच्या वेतन आयोगात राहिलेल्या त्रुटींची दुरुस्ती होणार असल्यामुळे सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतनाची ग्रंथपालांसह इतर पदांवरील शिक्षक व कर्मचारी दुसºया खंडाची आतुरतेने वाट पाहत आहे. ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीवर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला असून, ग्रंथपाल पदाचे वेतनाचे अवमूल्यन करण्यात आलेले आहे. यासंदर्भात बक्षी समितीसमोर ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार, विनोद भंगाळे, जितेंद्र पाठक, जगदीश चित्ते, पंडित वाघमारे यांनी सुनावणीस उपस्थित राहून अर्धवेळ ग्रंथपालांची बाजू मांडली आहे.

टॅग्स :libraryवाचनालयEmployeeकर्मचारी